भारतातील पहिला कोरोनाव्हायरसचा रुग्ण केरळमधील एक तरुणी असल्याचे काल अधिकृतपणे स्पष्ट झाले आहे. सदर तरुणी चीनमधील वुहान विद्यापीठात शिक्षणासाठी होती. सध्या तिची प्रकृती स्थिर असून इस्पितळात तिच्यावर उपचार करणारे तज्ज्ञ तिच्यावर लक्ष ठेवून आहेत. या वृत्ताला केंद्राच्या पत्र सूचना कार्यालयाने एका निवेदनाद्वारे पुष्टी दिली आहे. इस्पितळातील एका वेगळ्या खास वॉर्डमध्ये सदर युवतीवर उपचार केले जात आहेत, असे या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान केरळचे आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनी सांगितले की, २० संशयास्पद कोरोना व्हायरल रुग्णांचे नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले होते.