‘कोरोना’वर औषध शोधल्याचा रामदेवबाबांचा दावा

0
128

‘कोरोना’च्या महामारीमुळे संपूर्ण जग संकटात असताना बाबा रामदेव यांनी कोरोनावर औषध शोधल्याचा दावा केला आहे. ‘कोरोनिल’ हे कोरोना विषाणूवर उपचार करण्यासाठी बनवलेले औषध असून नुकतेच त्यांनी ते लॉन्च केले आहे. या विषाणूला हरविण्यासाठी आयुर्वेदिक औषधच प्रभावी ठरू शकतात, असेही त्यांनी म्हटले आहे.

या आयुर्वेदिक औषधावर पतंजली रिसर्च इन्स्टिट्यूट आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, जयपूर यांनी संयुक्तपणे संशोधन केलेले आहे. दिव्य कोरोनिल टॅब्लेटमध्ये अश्‍वगंधा, गिलोय, अणू तेल, श्‍वासारी रस, तुळशी यासारख्या औषधी वनस्पतींचा समावेश केला आहे. संक्रमित रुग्णांमध्ये चाचण्या घेतल्या आहेत. पतंजलीचे सीईओ बाळकृष्णन यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. कोरोनिल’ कोविड-१९ रुग्णांना ५ ते १४ दिवसांत बरे करू शकते, असेही त्यांनी म्हटले आहे.