>> केंद्रीय आरोग्य मंत्रालय ः कोरोना बळी १९९
भारतातील कोरोनाबाधितांच्या संख्येत बरीच वाढ होत असल्याने ती चिंतेची बाब असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काल स्पष्ट केले. कालच्या दैनंदिन पत्रकार परिषदेत ही बाब स्पष्ट करण्यात आली. गेल्या २४ तासात कोरोनामुळे ३३ जणांचा मृत्यू झाला असून नवीन कोरोना पॉजिटिव्ह ठरलेल्यांची कालची संख्या ६७८ एवढी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी दिली.
देशातील कोरोना बळींची संख्या काल १९९ एवढी झाल्याचे अगरवाल यांनी सांगितले. तसेच कोरोनाबाधितांची संख्या ६४१२ एवढी झाल्याचे ते म्हणाले. यात महाराष्ट्रातील संख्या सर्वाधिक १३६४ एवढी आहे. तेथील मृतांची संख्याही सर्वाधिक ९७ झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
प्राप्त माहितीनुसार एप्रिलपर्यंत देशभरात स्थलांतरीत व इतरांसाठी ९,३७,९७८ छावण्या मदतीसाठी कार्यरत आहेत. त्यात राज्य सरकारांच्या ३४ हजार छावण्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले