कोरोनाने शुक्रवारी २ मृत्यू

0
237

राज्यातील आणखी १९८ कोरोना रुग्ण बरे झाले असून सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या १३००च्या खाली आली आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे ९५.७८ टक्के एवढे आहे. राज्यातील आत्तापर्यंत ४४ हजार ६६५ कोरोना रुग्ण बरे झाले आहेत.

राज्यात चोवीस तासात नवीन १५२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून २ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ६७२ झाली आहे. कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४६ हजार ६३२ झाली असून सध्याच्या रुग्णांची संख्या १२९५ एवढी झाली आहे.

आणखी २ रुग्णाचा मृत्यू
गेल्या चोवीस तासांत आणखी २ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उसगाव येथील ६० वर्षीय पुरुष रुग्णाचा बांबोळी येथील गोमेकॉमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तर, कुडतरी येथील एका ७२ वर्षीय पुरुष रुग्णाला मृतावस्थेत मडगाव येथील हॉस्पिसियो इस्पितळात आणण्यात आले होते अशी माहिती आरोग्य खात्याच्या अहवालात देण्यात आली आहे.
कोरोनाचे सौम्य लक्षण असलेल्या नवीन ११० रुग्णांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. इस्पितळात नवीन ४८ कोरोना रुग्णांना दाखल करण्यात आले आहेत. बांबोळी येथील कोविड प्रयोगशाळेत नवीन १७६३ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.

पणजीत नवे २ कोरोना रुग्ण
पणजी परिसरात नवीन २ कोरोना रुग्ण आढळून आले असून पणजीतील कोरोना रुग्णांची सध्याची संख्या ८७ झाली आहे. राज्यात फोंडा परिसरातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या १०८ एवढी आहे. मडगाव परिसरात ९१ रुग्ण, वास्कोत ७७ रुग्ण, कुठ्ठाळीत ६८ रुग्ण, पर्वरीत ८६ रुग्ण, कांदोळीत ८१ रुग्ण, म्हापसा येथे ५२ रुग्ण आहे. राज्यातील इतर भागांत सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ५० पेक्षा कमी आहे.