राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या एकूण संख्येने ५३ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. चोवीस तासांत नवीन ७० कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर, आणखी एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
कोरोना रुग्णांची एकूण संख्या ५३ हजार ०४७ एवढी झाली असून सध्याच्या रुग्णांची संख्या ७७४ एवढी आहे. कोरोना बळींची एकूण संख्या ७६३ एवढी आहे.
दक्षिण गोव्यातील एका खासगी इस्पितळात काणकोण येथील ५९ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्या रुग्णाला २० जानेवारीला इस्पितळात दाखल करण्यात आला होता.
राज्यातील आणखीन ६२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५१ हजार ५१० एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०९ टक्के एवढे आहे.
कोरोनाचे सौम्य लक्षण असलेल्या नवीन ४२ रुग्णांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. नवीन २१ कोरोना रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहेत.
राज्यात चोवीस तासांत नवीन १४७६ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यातील ४.७४ टक्के नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
पणजी परिसरातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ८४ झाली आहे. पर्वरी येथील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ६८ झाली आहे. मडगाव परिसरातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ९३ झाली आहे.