राज्यात गेल्या चोवीस तासांत आणखी ४ रुग्णांच्या बळींची नोंद झाली आहे. तसेच काल रविवारी नवे ६० बाधित रुग्ण आढळून आले असून राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ६०४ झाली आहे. राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ३३४६ एवढी झाली आहे. रविवारी राज्यातील ६२ बाधित रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७७ टक्के एवढे झाले आहे. ४६ जणांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे.