राज्यात काल मंगळवारी कोरोनाचे ३२ रुग्ण सापडले आहेत. तसेच एका रुग्णाचे कोरोनामुळे निधन झाले. त्यामुळे राज्यातील बळींची संख्या ३५१५ एवढी असून राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या आता ३८८ झाली आहे. तसेच गेल्या चोवीस तासांत ३९ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८३ टक्के एवढे आहे. काल मंगळवारी कोरोनाची लक्षणे जाणवल्याने एका रुग्णाला इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
तसेच कोरोनामुक्त झाल्यामुळे तिघांना इस्पितळातून घरी पाठवण्यात आले. काल कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवल्याने ३१ जणांनी घरी विलगीकरणाचा पर्याय स्वीकारला आहे. काल मंगळवारी राज्यात कोरोनासाठी २६६३ जणांची स्बॅव चाचणी करण्यात आली.