काल गुरूवारी राज्यात कोरोनामुळे तिघांचा बळी गेला. त्यामुळे राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ७१६ झाली आहे. सध्याच्या रुग्णांची संख्या ९७५ एवढी झाली आहे. राज्यात कोरोनाबाधित नवे ८८ रुग्ण सापडल्याने कोरोनाचा संसर्ग झालेल्या कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४९ हजार ७४५ एवढी झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६० टक्क्यांवर पोहोचले आहे. तसेच काल राज्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ४८,०५४ झाली असल्याची माहिती आरोग्य खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे. काल खात्यातर्फे १६६५ जणांची स्वॅब चाचणी करण्यात आली.
आतापर्यंत ३,७७,३४३ एवढ्या लोकांची कोरोना संसर्गाची चाचणी करण्यात आलेली आहे. कोरोना संसर्ग झालेल्या १३,९५५ जणांनी राज्यातील इस्पितळात उपचार घेतले आहेत. तर २५,९१७ जणांनी घरी विलगीकरणात राहून उपचार घेतले आहेत.
दक्षिण गोव्यात मडगाव येथे सर्वाधिक १५५ रुग्ण असून केपे ५९, वास्को ५६ तर फोंड्यात ५३ रुग्ण आहेत. उत्तर गोव्यातील पर्वरीत ६१, पणजीत ५६ रुग्ण उपचार घेत असून इतर ठिकाणी ५० पेक्षा कमी रुग्ण आहेत.
उत्तर गोव्यातील कोविड केअर सेंटरमध्ये २७५ पैकी २६९ खाटा रिक्त असून तिथे ६ जण उपचार घेत आहेत. तर दक्षिण गोव्यातील ६० पैकी ४४ खाटा रिक्त असून तिथे १६ जण उपचार घेत आहेत. काल कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या ५२ जणांनी घरी विलगीकरणाचा निर्णय घेतला. तर २९ जणांनी इस्पितळात विलगीकरणात राहण्याचे ठरवले.
लशीकरणाच्या पहिल्या टप्प्यात १० हजार कोटी खर्च
कोरोना लशीकरणासाठी भारताला पहिल्या टप्प्यात तब्बल १० हजार ३१२ ते १३ हजार २५९ कोटींचा खर्च येणार आहे. अमेरिकेनंतर भारतात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. भारत पुढील सहा ते आठ महिन्यांमध्ये जवळपास ३० कोटी लोकांना कोरोना लस देण्याची योजना आहे. आरोग्य कर्मचारी तसेच इतर काम करणारे कर्मचारी यांच्यासाठीच भारताला पहिल्या टप्प्यात ६० कोटी डोसची गरज आहे.
भारत सरकारने कोरोना लशीला मान्यता मिळाल्यानंतर सरकारने लस कोणाला दिली जाईल याची यादी तयार केली आहे. सर्वात प्रथम १ कोटी आरोग्य सेवकांना लस दिली जाणार आहे. यानंतर पोलीस, सैन्य दलातील जवान, ५० पेक्षा जास्त वयाचे नागरिक आणि त्यानंतर व्याधी असणार्या ५० पेक्षा कमी वयाच्या नागरिकांना लस दिली जाणार आहे.