काल बुधवारी राज्यात कोरोनामुळे तिघांचा बळी गेला. त्यामुळे राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ७१३ झाली आहे. सध्याच्या रुग्णांची संख्या ९७९ एवढी झाली आहे. राज्यात कोरोनाबाधित नवे ९१ रुग्ण सापडल्याने कोरोनाचा संसर्ग झालेल्या कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४९ हजार ६५७ एवढी झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.५९ टक्क्यांवर पोहोचले आहे. तसेच काल राज्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ४७,९६५ झाली असून आरोग्य खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे. काल खात्यातर्फे १७५८ जणांची स्वॅब चाचणी करण्यात आली.
आतापर्यंत ३,७५,६७८ एवढ्या लोकांची कोरोना संसर्गाची चाचणी करण्यात आलेली आहे. कोरोना संसर्ग झालेल्या १३,९२६ जणांनी राज्यातील इस्पितळात उपचार घेतले आहेत. तर २५,८६५ जणांनी घरी विलगीकरणात राहून उपचार घेतले आहेत.
दक्षिण गोव्यात मडगाव येथे सर्वाधिक १४९ रुग्ण असून वास्कोत ५५ रुग्ण आहेत. उत्तर गोव्यातील पर्वरीत ६४, पणजीत ५३ रुग्ण उपचार घेत असून इतर ठिकाणी ५० पेक्षा कमी रुग्ण आहेत.
उत्तर गोव्यातील कोविड केअर सेंटरमध्ये २७५ पैकी २६९ खाटा रिक्त असून तिथे ६ जण उपचार घेत आहेत. तर दक्षिण गोव्यातील ६० पैकी ४६ खाटा रिक्त असून तिथे १४ जण उपचार घेत आहेत. काल कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या ६६ जणांनी घरी विलगीकरणाचा निर्णय घेतला. तर २७ जणांनी इस्पितळात विलगीकरणात राहण्याचे ठरवले.