गेल्या २४ तासांत राज्यात कोविडमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला, तर कोरोनाचे नवे २१ रुग्ण सापडले. कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली असली तरी कोरोना बळींच्या संख्येतील चढ उतार कायम आहे.
राज्यात गेल्या २४ तासांत ५४ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, सक्रिय रुग्णांची संख्या आता २३७ एवढी झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.३४ टक्के एवढे आहे, तर कोविड संक्रमण दर १.३२ टक्के एवढा आहे.
दरम्यान, कालच्या एका कोविड बळीमुळे राज्यात आतापर्यंत मृत्यूमूखी पडलेल्या रुग्णांची संख्या ही ३८२२ एवढी झाली आहे.