कोरोनाच्या केपी 1, 2 बाधित रुग्ण ठणठणीत ः डॉ. सूर्यवंशी

0
19

गोव्यात कोरोनाच्या नव्या केपी 1 व केपी 2 या उत्सर्जित विषाणूंची लागण झालेल्या सर्व रुग्णांची प्रकृती ठणठणीत असून हे रुग्ण बरे होऊन इस्पितळातून घरी गेले आहेत. अशी माहिती काल गोव्याचे साथींच्या रोगांच्या विभागाचे प्रमुख डॉ. ए. के. प्रकाश सूर्यवंशी यांनी दिली. त्यामुळे भीती बाळगण्याचे कारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात केपी 1 चे चार तर केपी 2 चे 12 रुग्ण आढळले असून या एकूण रुग्णांची संख्याही 16 एवढी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यासंबंधी पुढे बोलताना ते म्हणाले की सिंगापूरमध्ये कोरोना संसर्गाची प्रकरणे वाढण्यास हे दोन्ही नवे उपप्रकार जबाबदार आहेत. पण ते फारसे धोकादायक नसल्याचे आता स्पष्ट झाले असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे ह्या उपप्रकारांच्या संसर्ग झालेल्या रुग्णांना इस्पितळातही भरती होण्याची आवश्यकता भासत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भारतात केपी 1 व केपी 2 या संसर्ग झालेले 324 रुग्ण आढळले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गोव्यात जिनोस सिक्वेन्सिंग प्रयोगशाळा आहे. त्यामुळे कोविड-19 च्या नवीन प्रारुपांचा संसर्ग झालेले रुग्ण ओळखणे शक्य होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.