>> होम आयसोलेशनखाली २१६० रुग्ण
राज्यात कोरोनाने आणखी ७ रुग्णांचा बळी काल घेतला. कोरोना बळींची संख्या त्यामुळे आता १११ वर पोहोचली आहे. काल दिवसभरात नवे ३५५ कोरोना रुग्ण आढळून आले असून सध्याच्या रुग्णांची संख्या ३८२५ एवढी झाली आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ११,९९४ एवढी झाली आहे.
कुडचडे येथील ६७ वर्षीय महिला, शिवोली येथील ८३ वर्षीय पुरुष, चिंबल येथील ३५ वर्षीय युवक, फोंडा येथील ९१ वर्षीय पुरुष, बायणा वास्को येथील ७६ वर्षीय महिला, कुंकळ्ळी येथील ६४ वर्षीय महिला, तसेच हळदोणा येथील ५६ वर्षीय महिलेचा त्यात समावेश आहे.
आणखी २०९ रुग्णांनी होम आयझोलेशनचा पर्याय स्वीकारला असून होम आयझोलेशनखालील रुग्णांची संख्या २१६० झाली आहे. राज्यातील आणखी २८३ रुग्ण बरे झाले आहेत.
श्रीपाद नाईकांवर उपचारांसाठी
‘एम्स’ च्या डॉक्टरांची मदत
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्यावर उपचारासाठी दिल्लीतील भारतीय आयुर्विज्ञान संस्थान म्हणजे एम्सच्या डॉक्टराची मदत घेतली जात असून एम्समधील तज्ज्ञ डॉक्टरांचे एक खास पथक मंगळवारी गोव्यात दाखल होणार आहे.
केंद्रीय मंत्री नाईक गेल्या १२ ऑगस्ट रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.