कोरोनाचे नवे १३६ रुग्ण

0
155

>> साखळीतील रुग्णसंख्या ५० वर : २ हजारांचा टप्पा केला पार

राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाणात वाढत आहे. पुन्हा एकदा एकाच दिवशी आत्तापर्यतचे सर्वाधिक नवीन १३६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण काल आढळून आले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या एकूण संख्येने दोन हजाराचा टप्पा पार केला आहे. राज्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २०३९ एवढी झाली असून त्यातील १२०७ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या ८२४ एवढी आहे.

कांदोळी, पर्रा, करमळी, मोती डोंगर या ठिकाणी नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. करमळी येथे ३ रुग्ण, कांदोळी येथे २ रुग्ण, पर्रा – म्हापसा येथे २ रुग्ण आढळून आले आहेत. मोती डोंगर येथे १४ रुग्ण आढळून आले आहेत.

कुंकळ्ळी, सांगे, केपेत नवीन रुग्ण
कुंकळ्ळी येथे नवीन ८ रुग्ण आढळून आले असून रुग्णांची एकूण संख्या १४ झाली आहे. केपे येथे ४ रुग्ण आढळून आले असून रुग्णांची संख्या १६ झाली आहे. सांगे येथे नवीन १ रुग्ण आढळून आला असून रुग्णांची संख्या ४ झाली आहे.

साखळीत ६ रुग्ण
साखळी परिसरात ६ रुग्ण आढळून आले असून रुग्णांची एकूण संख्या ५० वर पोहोचली आहे. विर्डी, साखळी परिसरात नवीन ५ रुग्ण आढळून आले आहेत.

काणकोण, पेडणे, वाळपईत रुग्ण
काणकोण येथे नवीन १ रुग्ण आढळून आला असून रुग्णांची संख्या ८ झाली आहे. पेडणे येथे १ रुग्ण आढळून आला आहे. वाळपई येथे १ रुग्ण आढळून आला आहे.

फोंड्यात ३ रुग्ण
फोंड्यात नवीन ३ रुग्ण आढळून आले असून रुग्णांची एकूण संख्या ३२ वर पोहोचली आहे. मंडूर येथे १ रुग्ण आढळून आला असून रुग्णांची संख्या १३ झाली आहे.

वास्को परिसरात रुग्ण
सडा, वास्को येथे नवीन ५ रुग्ण आढळले असून रुग्णसंख्या ७८ झाली आहे. बायणा येथे आणखी ११ रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या ८५ झाली आहे. न्यूववाडे येथे नवीन ७ रुग्ण आढळले असून रुग्णसंख्या ६८ झाली आहे. खारीवाडा येथे ११ रुग्ण आढळले आहेत. जुवारीनगरात आणखी ५ रुग्ण आढळले असून रुग्णसंख्या १०६ झाली आहे.

बाळ्ळी, चिंबल येथे रुग्ण
बाळ्ळी येथे नवीन ३ रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या २७ झाली आहे. चिंबल येथे १ रुग्ण आढळून आला असून रुग्णसंख्या ५४ झाली आहे.

नेरूल येथे १ आयसोलेटेड कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. तसेच कुंभारजुवा आणि बाणावली येथे प्रत्येकी १ आयसोलेटेड रुग्ण आढळून आला आहे.

कांदोळी येथील एका खासगी इस्पितळामधील पेशंट अटेंडंट कोरोना पॉझिटिव्ह मिळाल्याने हॉस्पिटल बंद करण्यात आले असून डॉक्टर व कर्मचार्‍यांना होम क्वारंटाइन झाले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

वेर्ला, काणका, म्हापसा येथील सासू आणि सुनेला कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. वेर्णा येथील औषध निर्मिती कंपनीत सून कामाला आहे. त्यांच्या कुटुंबियांना घरीच क्वारंटाईन करून ठेवण्यात आले आहे.

जेलगार्ड कोरोना पॉझिटिव्ह
पोलीस, अग्निशमन दलानंतर आता कारागृहात कोरोना विषाणूचा फैलाव झाला आहे. कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहातील एक जेलगार्ड कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. हा जेलगार्ड चिखली, वास्को येथील रहिवासी आहे. गेल्या रविवारी हा जेलगार्ड कामाला आला होता. कोलवाळ कारागृहातील सर्व जेलगार्डची कोविड चाचणी केली जात आहे.