राज्यात चोवीस तासांत एकाही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली नाही. नोव्हेंबर महिन्यात आतापर्यंत तीन दिवस एकाही कोरोना रुग्णाच्या मृत्यू नोंद झालेली नाही. राज्यात ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबर महिन्यात कोरोना बळीच्या संख्येत घट झालेली दिसून येत आहे. नोव्हेंबर महिन्यात आत्तापर्यंत कोरोनाने ७३ जणांचा बळी घेतला आहे. राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ६७७ एवढी आहे.