अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी तेलंगणाच्या सायबराबाद पोलिसांनी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कोरिओग्राफरला गोव्यातून अटक केली.
जानी मास्टर असे या कोरिओग्राफरचे नाव आहे. टॉलिवूड म्हणजेच दाक्षिणात्य सिनेसृष्टीतला तो प्रसिद्ध कोरिओग्राफर आहे. त्याच्या विरोधात काही दिवसांपूर्वी 21 वर्षीय मुलीने लैंगिक शोषणची तक्रार नोंदवली होती. जानी मास्टरने बाहुबली, पुष्पा- द राइझ, स्त्री-2 या सिनेमांचे नृत्य दिग्दर्शन केले आहे.
16 सप्टेंबरला जानी मास्टर या कोरिओग्राफरच्या विरोधात 21 वर्षीय महिलेने तक्रार नोंदवली होती. जानी मास्टरने आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप या महिलेने केला. जानी मास्टर गेल्या सहा वर्षांपासून तिचे शोषण करत होता. या प्रकरणात पॉक्सो कायद्यातंर्गत जॉनी मास्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर सायबराबाद पोलिसांनी गोव्यातून त्याला अटक केली.