कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या १३व्या पर्वास १९ सप्टेंबरपासून यूएईत प्रारंभ होणार आहे. सर्व संघ यासाठी जोरदार तयारी करीत आहेत. लोकेेश राहुलच्या नेतृत्वाखाली किंग्ज इलेव्हन पंजाबच्या नजरा आपले पहिले आयपीएल जेतेपद मिळविण्याकडे असेल. परंतु त्यासाठी त्यांचा अनुभवी व तेज गोलंदाज मोहम्मद शमीचे कामगिरी सर्वांत महत्त्वाची ठरणार आहे. शमीनेही आपण कोणत्याही आव्हानांसाठी तयार असल्याचे सांगितले आहे.
यूएईत सध्या उष्ण हवामान असून अशात तेज गोलंदाजी करणे बरेच कठीण ठरणार आहे. परंतु शमी मात्र या उष्ण हवामानाला आव्हान मानत नाही आहे. त्याने स्पष्ट केले की तो कोणत्याही स्थितीत गोलंदाजी करण्यासार्ठीं तयार आहे आणि गरमीपासूनही त्याला त्रास होणार नाही आहे.
शमीने लॉकडाऊनमध्ये मुरादाबादच्या स्टेडियमवर कसून सराव केलेला आहे. त्याच्या मते गेल्या चार महिन्यात केलेल्या सरावाचा फायदा त्याला आयपीएलच्या १३व्या पर्वात निश्चितच मिळेल. दुबईतील खेळपट्ट्या भारतासारख्याच असतील असे शमीला वाटते. स्टेडियममध्ये खेळपट्टी कशी आहे हे अजून कोणीही बघितलेले नाही आहे. सामना सुरू होण्यापूर्वी पाहूनच त्यानुसार गोलंदाज करेन. मी दरवेळी प्रमाणे कोणत्याही आव्हानासाठी तयार आहे, असे शमी म्हणाला.
शमीने या मोसमासाठी गुप्त योजनाही आखल्या आहेत. आण ‘स्टॉक बॉल‘चा जेवढा जास्त होईल तेवढा उपयोग करण्याचा प्रयत्न करणार आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ यंदाच्या आयपीएलमध्ये आत्तापर्यंतची सर्वांत चांगली ‘बॅटिेेंग लाईनअप’ निवडली आहे. कागदावर संघ बराच समतोल दिसत आहे, असे शमीने सांगितले.
कर्णधार ज्या स्थितीत गोलंदाजीसाठी बोलावणार आहे त्याप्रमाणे मी गोलंदाजी करणार आहे. मी कधीच फलंदाजांसमोर जास्त दबाव घेत नाही. जेव्हा चेंडू हातात असतो तेव्हा मला वाटते की मी राजा आहे, असे शमी म्हणाला.
शमीने गेले ३-४ महिने तंदुरुस्तीवर बरीच मेहनत घेतल्याचा दावाही केला आहे. त्याच बरोबर त्याचे कौशल्यही तंदुरुस्तीमुळे सर्वोत्तम झालेले असल्याचे शमीने शेवटी सांगितले.