मुंबई-मेंगलोर कोकण रेल्वेने विनातिकीट प्रवास करणार्या राजस्थानच्या एका व्यकतीकडून कारवारच्या कोकण रेल्वे पोलिसांनी काल २ कोटी रुपयांची रोक जप्त केली.
संशयासपदरित्या बॅग घेऊन जाणार्या सदर इसमाला पोलिसांनी ती उघडण्यास सांगितल्यानंतर सदर इसमाने नकार दिला. मात्र पोलिसांनी ज्यावेळी बॅग उघडली, त्यावेळी त्यात ही रक्क्म आढळली. सदर रक्कम आपण मेंगलोर येथील एका व्यक्तीला देण्यासाठी मुंबईहून आलो असल्याचे सदर व्यक्तीने सांगितले. मात्र रेल्वे पोलिसांनी पंचनामा करून संशयितासहित पैशांची बॅग कारवारच्या पोलिसांच्या स्वाधीन केली, अशी माहिती कारवारच्या कोकण रेल्वेचे पोलीस निरीक्षक विपील सिंग यांनी दिली.