कोकण रेल्वे मार्गावरील मडुरे ते माजोर्डा या विभागातील मालमत्तेच्या देखभालीसाठी आज सोमवारी अडीच तासांचा मेगा ब्लॉक केला जाणार आहे. आज सोमवारी रात्री 9.25 ते 11.55 या वेळेत मेगा ब्लॉक लोकमान्य टिळक, तिरुवअनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस, रत्नागिरी, सावंतवाडी रोड दरम्यान अडीच तासांसाठी नियमित केला जाणार आहे. गाडी क्र. 12619 लोकमान्य टिळक मंगळुरू, मत्स्यगंधा गाडी रत्नागिरी, कुडाळ दरम्यान 30 मिनिटांसाठी नियमित केली जाईल. गाडी क्र. 17310 ही वास्को द गामा यशवंतपूर एक्सप्रेस वास्को द गामा येथून नेहमीपेक्षा 30 मिनिटे उशिरा सुटेल. ती रात्री वास्को येथून 11.25 वा. सुटेल.