कोकण मराठी परिषदेतर्फे तिसवाडी साहित्य संमेलन

0
7

कोकण मराठी परिषदेतर्फे यंदा प्रथमच ब्रह्मपुरी, जुने गोवे येथे गोमंतेश्वर मंदिराच्या प्रांगणात तिसवाडी तालुका पातळीवरील साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता या एकदिवसीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. या संमेलनाचे अध्यक्ष लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक व ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री विनायक खेडेकर भूषविणार आहेत. प्रारंभी गोमंतेश्वर मंदिराच्या प्रांगणात साहित्य दिंडी काढण्यात येईल. नंतर संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी आमदार राजेश फळदेसाई, संमेलनाध्यक्ष विनायक खेडेकर, कोकण मराठी परिषदेच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष ॲड. रमाकांत खलप आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित असतील. भोजनोत्तर सत्रात मान्यवरांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर तिसवाडी तालुक्यातील कवींचे कविसंमेलन संपन्न होईल, असे कोमपच्या सचिव चित्रा क्षीरसागर यांनी कळविले आहे.