कोकणी युवा साहित्य संमेलन

0
103

पणजी (प्र. प.)
युवा प्रतिभेला बहर यावा या हेतूने गोवा कोकणी अकादमी गेल्या वीस वर्षांपासून युवा कोकणी साहित्य संमेलन आयोजित करीत आहे. यंदा १९ वे युवा साहित्य संमेलन आयोजित करण्यासाठी अकादमीने महाविद्यालये आणि सांस्कृतिक संस्थांकडून जाहीरपणे अर्ज मागविले आहे. या संमेलनाचा आर्थिक भार अकादमी उचलणार असून आयोजनाची सगळी व्यवस्था जोड आयोजक संस्थेला करावी लागेल. या संबंधीची नियमावली अकादमीच्या कार्यालयात उपलब्ध आहे. इच्छुक महाविद्यालये आणि सांस्कृतिक संस्थांनी कार्यालयीन वेळेत अकादमीत येऊन नियमावली न्यावी आणि १९ वे युवा साहित्य संमेलन आयोजित करण्यासाठी आपले अर्ज सादर करावेत, असे अकादमीने आवाहन केले आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २५ ऑक्टोबर आहे. अधिक माहितीसाठी अकादमीकडे २४३७३८५ आणि २४३७३८७ या फोन नंबरवर संपर्क साधावा.