कोरोनावरील कॉर्बेव्हॅक्स लसीच्या उपलब्धतेविषयी आणि वापराविषयी लोकांमध्ये जागृती करण्यासाठी बसस्थानक, रेल्वेस्थानक, विमानतळ, महाविद्यालये आणि शक्य त्या सर्व सार्वजिनक ठिकाणी शिबिरांचे आयोजन करा, असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी सर्व राज्य सरकार आणि केंद्र शासित प्रदेशांना हे निर्देश दिले आहेत.
कॉर्बेव्हॅक्स लस १२ ऑगस्टपासून सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही लसीकरण केंद्रांवर उपलब्ध करण्यात आली आहे. यासाठी नागरिकांना कोविन ऍपवर बूस्टर डोससाठी नोंदणी मात्र करावी लागणार आहे. कॉर्बेव्हॅक्स ही विषम कोविड-१९ बूस्टर म्हणून मान्यता मिळालेली भारतातील पहिली लस आहे. ज्या नागरिकांनी कोवॅक्सिन किंवा कोविशिल्ड या लशीचे दोन डोस घेतले आहेत, ते नागरिक कॉर्बेव्हॅक्स या मिक्स्ड लसीचा बूस्टर डोस घेऊ शकतात.