कॉंग्रेस पक्षाकडून ‘दिल्ली चलो’चा नारा

0
36

महागाईच्या मुद्यावरून मोदी सरकारला घेरण्यासाठी कॉंग्रेसने ‘दिल्ली चलो’चा नारा दिला आहे. तसेच कॉंग्रेस ७ सप्टेंबरपासून भारत जोडो यात्रेला सुरुवात करणार आहे. या यात्रेबाबत कॉंग्रेस पक्षाने मंगळवारी महत्त्वाच्या घोषणा केल्या. त्याअंतर्गत २९ ऑगस्ट रोजी एकाच वेळी २२ शहरांमध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात येणार आहे. त्यानंतर ५ सप्टेंबर रोजी ३२ शहरांमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली जाणार आहे. ज्यामध्ये कॉंग्रेस पक्ष रणनीती आणि सर्व मुद्यांवर आपली बाजू मांडणार आहे.

मंगळवारी कॉंग्रेस पक्षाने भारत जोडो यात्रेसंदर्भात होणार्‍या पत्रकार परिषदेला दुजोरा दिला. २९ ऑगस्ट रोजी कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते एकाच वेळी २२ शहरांमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. ज्यामध्ये महागाईच्या मुद्यावरून सरकारला घेरण्याची कॉंग्रेसची योजना आहे. तसेच ५ सप्टेंबर रोजी ३२ शहरांमध्ये एकाच वेळी पत्रकार परिषद आयोजित केली जाणार आहे.