कॉंग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स युती संपुष्टात : ओमर

0
114

जम्मू काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्स व कॉंग्रेस पक्षातील युती संपुष्टात आल्याचे व नॅशनल कॉन्फरन्स येत्या विधानसभा निवडणुकीत एकाकी लढणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सांगितले. आपण दहा दिवसांपूर्वीचा कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेऊन पक्षाने एकाकी लढण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांच्या कानावर घातले असल्याचे सांगितले. मात्र याबाबत आपण उघड घोषणा करणार नसल्याचेही त्यांना सांगितल्याचे ओमर यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले. दरम्यान, जम्मू काश्मीरचे कॉंग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनीही काल पक्ष सर्व ८७ जागांवर लढणार असल्याचे काल म्हटले.