कॉंग्रेसशासित राज्यांनी पर्यायी कृषी कायदे करावेत ः सोनिया

0
256

मोदी सरकारने आणलेल्या तिन्ही कृषी कायद्यांविरोधात कॉंग्रेसने आक्रमक होत कॉंग्रेसशासित राज्यांना या कायद्यांविरोधात पर्यायी कायदे तयार करण्याचा सल्ला दिला आहे. कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी हा सल्ला दिलेला असून यामुळे मोदी सरकारविरूद्ध कॉंग्रेसशासित राज्ये असा नवा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी व कृषी सेवा करार आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) ही तिन्ही विधेयके गेल्या आठवड्यात संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मंजूर झाल्यानंतर त्यावर राष्ट्रपतींचीही स्वाक्षरी झाल्याने त्यांचे आता कायद्यात रुपांतर झाले आहे. या विरोधात शेतकर्‍यांत असंतोष दिसत असून शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत.