कॉंग्रेसने आपल्या उमेदवारांना मडगावात हलवले

0
17

सत्ताधारी भाजप आपल्या निवडून आलेल्या आमदारांना पळवून नेईल, अशी भीती कॉंग्रेसला वाटत असून, त्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसने मंगळवारीच आपल्या उमेदवारांना बांबोळी येथील एका पंचतारांकित हॉटेलात आणून तेथे त्यांची राहण्याची सोय केली होती. मात्र, काल कॉंग्रेसने आपल्या उमेदवारांना मडगावात हलवले. सर्व उमेदवारांचे मोबाईलही पक्षनेत्यांनी आपल्या ताब्यात घेतले आहेत.

१० फुटीर आमदारांविरोधात
सर्वोच्च न्यायालयात याचिका

कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या १० फुटीर आमदारांना अपात्र ठरवावे, यासाठी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काल सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मागच्या विधानसभेचा कार्यकाळ संपत आला असून, गुरुवारी विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर १० फुटीर आमदारांविरुद्ध आता सर्वोच्च न्यायालयात अपात्रता याचिका दाखल केली आहे, हे विशेष.