देशातील जनतेने गेली ४०-५० वर्षे ‘गरीबी हटाव’चा नारा ऐकला. हा नारा देणार्यांचा उद्देश जनहिताचा होता. मात्र, गरीबी दूर करण्यासाठी त्यांनी स्वीकारलेला मार्ग साफ चुकीचा होता. त्यामुळे देशातील गरीबी, बेरोजगारी गेली असे आरोप करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या ‘गरीबी हटाव’ घोषणेवर कडाडून हल्ला चढवला.
केंद्र सरकारच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त उडिशामधील मिसाईल शहरात आयोजित जाहीर सभेत जनतेला संबोधित करताना पंतप्रधानांनी उडिशात राजकीय बदल घडवून आणण्याचे आवाहन केले. पश्चिम भारतातील राज्ये पूर्वेकडील राज्यांपेक्षा विकासात का मागे आहेत, याचा विचार करण्याची वेळ येऊन ठेपली असल्याचे मोदी म्हणाले. उडिशात अमाप नैसर्गिक संपत्ती असूनही तेथील जनतेकडे दुर्लक्ष केले जाते. भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांमध्ये विकासाची स्थिती विदारक आहे. ओडिशा, पश्चिम बंगाल, बिहार आणि आसाममध्ये विकासाची गरज व्यक्तवून आपले सरकार देशाला गरीबीपासून मुक्त करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मोदी म्हणाले. भाजप म्हणजे विकास हे गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या राज्यांनी दाखवून दिले असल्याचे पंतप्रधान म्हणाले.