कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी शनिवारी गोव्यात येणार

0
32

कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी हे गोव्यात शनिवार दि. ३० ऑक्टोबर रोजी येत आहेत. राहुल गांधी हे गोवा विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या प्रचाराला यावेळी प्रारंभ करतील. आपल्या गोवा दौर्‍याच्यावेळी राहुल गांधी खाणबंदीचा फटका बसलेल्यांशी तसेच मच्छीमार बांधवांना भेटणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पक्षाचे अनेक नेते सध्या गोव्यात ठाण मांडून आहेत.