कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना अटक

0
94
New Delhi: Central Bureau of Investigation (CBI) officials escort Congress leader P Chidambaram from his Jor Bagh residence in New Delhi, Wednesday, Aug 21, 2019. The Delhi High Court on Tuesday refused to grant any protection from arrest to Chidambaram in the INX media case. (PTI Photo/Manvender Vashist)(PTI8_21_2019_000205B)

>> आयएनएक्स घोटाळा प्रकरणी कारवाई

>> आज दुपारी न्यायालयात हजर करणार

>> गेटवरून उड्या मारून सीबीआयने घेतले ताब्यात

>> अटकेप्रसंगी बंगल्याबाहेर ‘हायव्हॉल्टेज ड्रामा’

आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री, माजी केंद्रीय गृहमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना अखेर २८ तासांनंतर सीबीआयने त्यांच्या जोरबागमधील घरातून अटक केली आहे. अटक करण्यापूर्वी सीबीआय पथकाने तब्बल दीड तास चिदंबरम यांची कसून चौकशी केली. चिदंबरम यांच्या घराचे गेट बंद ठेवण्यात आल्याने त्यावरून उड्या मारून सीबीआय पथकाने आत प्रवेश करून कारवाई केली. हा ’हायव्होल्टेज ड्रामा’ सुरू असताना चिदंबरम यांच्या घराबाहेर कॉंग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. चिदंबरम यांना आज दुपारी २ वाजता कोर्टात हजर करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

चिदंबरम कॉंग्रेस मुख्यालयातून घरी गेल्याचे कळताच सीबीआयच्या पथकाने दिल्लीतील जोरबाग येथील त्यांचे निवासस्थान गाठले. मात्र, चिदंबरम यांच्या घराचा दरवाजा उघडला जात नसल्याने सीबीआयच्या अधिकार्‍यांनी गेटवरून उड्या मारून त्यांच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर तब्बल दीड तास चिदंबरम यांची चौकशी करण्यात आली. यावेळी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू संघवीही उपस्थित होते. चौकशी अंतिम टप्प्यात असताना सीबीआयने दिल्ली पोलिसांना घटनास्थळी बोलावले. त्यानंतर जमावाला पांगवून चिदंबरम यांना अटक केली.

चिदंबरम यांनी
आरोप फेटाळले
तत्पूर्वी, चिदंबरम यांनी कॉंग्रेस कार्यालयात त्यांच्या वकिलांसोबत पत्रकार परिषद घेऊन स्वत:वरील आणि मुलावरील सर्व आरोप ङ्गेटाळून लावले होते. आयएनएक्स मीडिया घोटाळ्यात मी किंवा माझा मुलगा आरोपी नाही. आमच्यावर कोणतेही आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. आम्हांला या घोटाळ्यात गोवले गेले आहे. आमच्यावरील सर्व आरोप खोटे असून तपास यंत्रणांनी कायद्याचे पालन करावे, असे चिदंबरम म्हणाले होते. हा खटला लढण्यासाठी वकिलांसोबत तयारी करत होतो. त्यामुळे तुमच्यासमोर येऊ शकलो नाही, असे स्पष्ट करत आपल्याला ङ्गरार म्हटले जात असल्याबद्दलही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

सीबीआय पथकाला अटकेवेळी धक्काबुक्की
चिदंबरम यांच्या निवासस्थानाबाहेर सीबीआय आणि ईडीचे पथक दाखल झाल्यानंतर तिथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. चिदंबरम यांच्या घराच्या गेटवर सीबीआय व ईडीच्या पथकाला कॉंग्रेस कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की करण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे.

अटकपूर्व जामीन
अर्जावर उद्या सुनावणी
आयएनएक्स मीडिया प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन ङ्गेटाळल्यानंतर सर्वोच्च न्यायलायात धाव घेणार्‍या माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या अटकपूर्व जामिनावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. याचिकेची सुनावणी कोणत्या खंडपीठासमोर घ्यायची याचा निर्णय आज गुरुवारी संध्याकाळपर्यंत घेतला जाणार आहे. त्या खंडपीठासमोर शुक्रवारी सुनावणी पार पडणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्या. एन. व्ही. रामणा यांच्या कोर्टासमोर काल (बुधवार) ही याचिका सुनावणीसाठी आली होती. मात्र, न्या. रामणा यांनी या प्रकरणावर निर्णय देण्यास नकार देत तुम्ही सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यासमोर दाद मागावी असा सल्ला चिदंबरम यांच्या वकिलांना दिला होता. मात्र, तोपर्यंत दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती तरी द्यावी अशी विनंती चिदंबरम यांचे वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टाला केली. मात्र, न्या. रामणा यांनी ती फेटाळली. चिदंबरम यांच्या वतीने वरिष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल, सलमान खुर्शिद आणि विवेक तनखा हे बाजू मांडत आहेत.