पणजी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने सिध्दार्थ कुंकळकर यांची उमेदवारी जाहीर केल्याने प्रदेश कॉंग्रेसही आज पक्षाचा उमेदवार जाहीर करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. पणजीसाठी कॉंग्रेस उमेदवार म्हणून महापौर सुरेंद्र फुर्तादो यांच्या नावालाच अधिक जोर असल्याचा दावा त्यांचे समर्थक करीत आहेत.