>> निजामाबादमधील जाहीर सभेत गौप्यस्फोट
तेलंगणामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी निजामाबादमधील जाहीर सभेत मोठा गौप्यस्फोट केला. भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सामील व्हायचे होते, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या सभेत केला.
तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर हे भारतीय जनता पक्षाच्या कट्टर विरोधकांपैकी एक समजले जातात. त्यांना पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सामील व्हायचे होते, परंतु आपण त्यांना एनडीए आघाडीत सामील होण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला, असा दावा पंतप्रधान मोदींनी केला.
केसीआर यांना माहित आहे की त्यांच्या भारत राष्ट्र समितीने (बीआरएस) एनडीएमध्ये सामील होण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र, आम्ही तेलंगणातील लोकांचा विश्वासघात करणार नाही, असे सांगत नकार दिला. या नकारानंतर त्यांचे डोके फिरले असल्याचेही मोदींनी म्हटले.
या लोकांनी लोकशाहीला लुटण्याच्या व्यवस्थेत बदलले आहे. त्यांनी लोकशाहीचे रुपांतर घराणेशाहीत केले आहे. हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीनंतर ते दिल्लीला भेटायला आले. त्यांनी माझ्याबद्दल प्रचंड प्रेम दाखवले. माझ्या नेतृत्वात देशाचा विकास झाला असेही त्यांनी बोलून दाखवले मात्र केसीआर यांचे असणे वागणे त्यांच्या स्वभावाला घेऊन नाही असे आपणास जाणवले, असेही मोदी म्हणाले.
बीएसआरचा पलटवार
के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीने पंतप्रधान मोदी यांचा दावा फेटाळून आला. बीआरएसचे केटी रामाराव म्हणाले की, लोक भाजपला फेक न्यूजची मोठी फॅक्टरी असल्याचे म्हणतात. पंतप्रधान मोदी स्वतः व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीचे कुलपती असल्याचा टोला त्यांनी लगावला. आज शिवसेना, जेडीयू, टीडीपीसह अनेक पक्ष शिरोमणी अकाली दलाने भाजपची साथ सोडली आहे. भाजपसोबत कोण आहे? सीबीआय, ईडी आणि आयटी या व्यतिरिक्त तुमच्याकडे कोण आहे? असा प्रश्न त्यांनी केला.