केसीआर यांच्याकडून ‘बीआरएस’ पक्ष स्थापन

0
10

तेलंगणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी काल दसर्‍याच्या मुहुर्तावर राष्ट्रीय पक्षाची स्थापना केली आहे. ‘तेलंगणा राष्ट्र समिती’ने (टीआरएस) राष्ट्रीय राजकारणात पाऊल ठेवल्यानंतर या पक्षाचे नामकरण आता ‘भारत राष्ट्र समिती’ (बीआरएस) असे करण्यात आले आहे. तेलंगणा भवनातील पक्षातील नेत्यांच्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली. ‘टीआरएस’चे ‘भारत राष्ट्र समिती’मध्ये रुपांतर करण्याचा ठराव पक्षाच्या बैठकीत सर्वानुमते संमत करण्यात आला. तेलंगणा भवनातील या बैठकीला २८३ आमदार, खासदार आणि जिल्ह्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. केसीआर यांचा राष्ट्रीय राजकारणातील प्रवेश आगामी २०२४ च्या निवडणुकीचा दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. नामकरणानंतर पक्षाच्या झेंड्यावर असलेले कारचे चिन्ह कायम राहणार आहे. या झेंड्यावर भारताचा नकाशा असणार आहे.