आरोग्य खात्याने परराज्यातून येणार्यांच्या तपासणीसाठी दोडामार्ग आणि केरी- सत्तरी येथील तपासणी नाक्यावर अद्ययावत तपासणी केंद्रे सुरू केली आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी काल दिली.
गोवा राज्याचा हरित विभागात समावेश असल्याने राज्यात कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून परराज्यातून प्रवेश करणार्यांची तपासणी करून त्यांना प्रवेश दिला जात आहे. जीव्हीके १०८ रुग्णवाहिकेतील तंत्रज्ञ तपासणी नाक्यावर येणार्यांचे नमुने घेऊन तपासणीसाठी कोविद प्रयोगशाळेत पाठविणार आहेत, असेही आरोग्यमंत्री राणे यांनी सांगितले.