केरळ सुवर्ण तस्करीमागे दाऊद असल्याचा संशय

0
271

केरळमध्ये झालेल्या सुवर्ण तस्करीप्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम व त्याची डी कंपनीचा हात असल्याचा संशय राष्ट्रीय अन्वेषण विभागाने (एनआयए) व्यक्त केला आहे. या तस्करीतून मिळणारा नफा देशविरोधी कार्याशी संबंधित गुप्तचर व दहशतवादी संघटनांसाठी वापरण्यात येतो असे एनआयएचे म्हणणे आहे.
या प्रकरणातील सर्व आरोपींना किमान १० दिवस तरी न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी करत त्यांच्या जामीन अर्जाला विरोध केला आहे. या प्रकरणातील आरोपी रमीस याने टांझानियामध्ये अनेक वेळा हिर्‍यांचा व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला असल्याचे एनआयएकडून सांगण्यात आले.