केरळ आता ‘केरळम’ म्हणून ओळखले जाणार

0
4

>> विधानसभेत नाव बदलण्यास एकमताने संमती

भारताच्या दक्षिण टोकाला असलेल्या केरळ राज्याचे नाव आता ‘केरळम’ केले जाणार आहे. त्यासाठी सुमारे वर्षभरापूर्वी केरळ विधानसभेने राज्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव एकमताने मंजूर केला होता. आज हा प्रस्ताव पुन्हा किरकोळ दुरुस्त्या करून पुन्हा मंजूर करण्यात आला. प्रत्यक्षात केंद्राने जुना प्रस्ताव परत करून त्यात सुधारणा करण्यास सांगितले, त्यानंतर सभागृहाने नवा प्रस्ताव मंजूर केला. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी मांडलेल्या ठरावात घटनेच्या पहिल्या अनुसूचीमधील राज्याचे नाव अधिकृतपणे ‘केरळम’ असे बदलण्यासाठी घटनेच्या कलम 3 अन्वये आवश्यक पावले उचलण्यात यावीत, अशी मागणी केली. हा सुधारित नवा प्रस्ताव आता केंद्र सरकारकडे मंजुरी करिता पाठविला जाणार आहे.

गेल्या वर्षी 9 ऑगस्ट रोजी राज्याचे अधिकृत नाव बदलण्याची मागणी करणारा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला होता.
भारत स्वातंत्र्य झाल्या नंतर 1956 साली त्रावणकोर-कोचीनचे केरळ हे नाव पडले होते आता त्यात बदल करुन केरळम हे नाव दिले जाणार आहे. तसेच भारतातील मध्य भारतचे मध्यप्रदेश, म्हैसूरचे कर्नाटक, उत्तरांचलचे उत्तराखंड अशी अनेक राज्यांची नावे नव्याने ठेवली गेली आहेत.