केरळसह तीन राज्यांमध्ये बर्ड फ्लूचे पुनरागमन

0
222

मध्य प्रदेश आणि राजस्थान पाठोपाठ बर्ड फ्लूची साथ केरळमध्येही आली असून प्रशासनाने परिस्थितीवर नजर ठेवण्यासाठी खास नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे.
डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात केरळमध्ये काही बदके मृतावस्थेत सापडली होती. त्यांचे नमुने भोपाळच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले असता पाच नमुन्यांमध्ये एच५एन८ म्हणजे बर्ड फ्लू आढळून आला. राजस्थानात व मध्य प्रदेशातही बर्ड फ्लू आढळला आहे.