केपे, बाळ्ळीत ४ रुग्ण

0
117

केपे येथे नवीन २ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून रुग्णांची संख्या १४ झाली आहे. बाळ्ळी येथे आणखी २ रुग्ण आढळून आले असून रुग्णांची संख्या २३ झाली आहे.

जुवारीनगर येथे आणखी १ रुग्ण आढळून आला असून रुग्णांची संख्या ९८ झाली. खारीवाडा येथे १ रुग्ण, न्यूववाडे येथे २ रुग्ण आढळले असून रुग्णांची संख्या ५९ झाली आहे.

पर्वरी येथील गोवा विधानसभा संकुलाच्या मागील बाजूच्या गेटवरील एक सुरक्षा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहेत. सर्व सुरक्षा कर्मचार्‍यांची चाचणी करण्यात आली.

गोवा वेल्हा, पेडण्यात नवीन रुग्ण
गोवा वेल्हा येथे नवीन ३ रुग्ण आढळून आले असून रुग्णांची संख्या ५ झाली आहे. पेडणे येथे नवीन ५ रुग्ण आढळून आले.