केपे-कावरे येथील वादग्रस्त मॅगनीज व लोहखनिज खाणीबाबत उद्या मंगळवार दि. 11 रोजी सुनावणी होणार होती. मात्र ही सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली आहे. कावरे येथील स्थानिकांचा या खाणीला तीव्र विरोध असून तेथील स्थानिक नागरिकांनी या संदर्भात उच्च न्यायालयात जनहीत याचिका दाखल केली आहे. या संदर्भात येथील 70 हेक्टर जमिनीतील खाणीसंदर्भातील सुनावणी दक्षिण गोवा जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांनी वरील सुनावणी पुढे ढकलली आहे.