केदारनाथमध्ये भूस्खलन

0
13

3 जणांचा मृत्यू, 8 जखमी

केदारनाथमध्ये भीषण दुर्घटना घडली असून केदारनाथ मंदिराकडे जाणाऱ्या पायी मार्गावर अचानक भूस्खलन झाले असून यामुळे 3 जणांचा मृत्यू झाला असून 8 जण जखमी झाले आहेत. उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रा सुरू आहे. यातच पावसाने कहर केला आहे. मुसळधार पावसामुळे भूस्खलनाच्या घटना घडत आहेत.
केदारनाथ मंदिराच्या पायी मार्गावर मोठी दुर्घटना घडली. केदारनाथ मंदिराकडे जाताना भूस्खलनामुळे तिघांचा मृत्यू झाला. तर इतर 8 जण जखमी झाले आहेत. हे भाविक सकाळी गौरीकुंडवरून निघाले होते. चीडवासाजवळ भूस्खलन झालं आणि तिघांनी जीव गमावला. अचानक पर्वत हादरल्यासारखे होऊन लोकांना काही कळाच्या आतच माती आणि दगडांचा ढिगारा अंगावर आला. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी सुरक्षा दलाकडून बचावकार्य राबवले जात आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. बचावकार्य सुरू असताना तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे.