केजरीवालांविरुद्ध खटला चालवण्यासकेंद्रीय गृहमंत्रालयाची ईडीला परवानगी

0
2

दिल्लीत विधानसभा निवडणुकीची धामधुमी सुरू असताना ‘आप’चे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिल्ली कथित मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध खटला चालवण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाने अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) मंजुरी दिली आहे.
दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी अरविंद केजरीवालांविरुद्ध खटला चालवण्यास होकार दिल्यानंतर गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला. सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबर 2024 मध्ये दिलेल्या आदेशात म्हटले होते की, लोकसेवकांवर खटला चालवण्यापूर्वी ईडीला पूर्वपरवानगी घ्यावी लागेल.