दिल्ली मद्य धोरणाशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणी राऊस एव्हेन्यू न्यायालयाने काल अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 19 जूनपर्यंत वाढ केली. केजरीवाल यांना व्हीसीमार्फत न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने केजरीवाल यांचा वैद्यकीय आधारावर 7 दिवसांचा जामीन मागणारा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला. तसेच केजरीवाल यांच्या आवश्यक वैद्यकीय चाचण्या घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.