केजरीवालांची कोठडी 7 मेपर्यंत वाढवली

0
17

कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 7 मेपर्यंत वाढ केली आहे. याआधी केजरीवाल यांची कोठडी 1 एप्रिल ते 15 एप्रिल, त्यानंतर 23 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली होती. न्यायालयाच्या या आदेशानंतर केजरीवाल आता लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यातील मतदानादरम्यानही तुरुंगातच राहणार आहेत.