केंद्रीय योजनांत सुधाराची पार्सेकरांची मागणी

0
114

काही केंद्रीय योजनांचा गोव्यासारख्या राज्याला फायदा होत नाही. त्यामुळे अशा योजनांचा सर्वच राज्यासाठी फायदा व्हावा म्हणून सुधारणा करण्याची मागणी आपण दिल्लीत झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत केल्याची माहिती मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल पत्रकारांना दिली. पंतप्रधान ग्राम सडक योजनेखाली वेगवेगळ्या राज्यांना बर्‍याच प्रमाणात निधी मिळतो. गोव्याला या योजनेचा वापर करण्यास अडचण येते. त्यामुळे केंद्राने पॅकेज स्वरुपात निधी मंजूर करावा, जेणेकेंकरून प्रत्येक राज्यांना गरजेनुसार या योजनेचा फायदा होऊ शकेल, असे आपण बैठकीत सांगितल्याचे ते म्हणाले. राज्यांना निधी देण्यासंबंधीचा गाडगीळ – मुखर्जी सूत्राचा फेरआढावा घेण्याची मागणीही आपण केल्याचे पार्सेकर यांनी सांगितले.