केंद्रीय मंत्री गडकरी यांची मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट

0
11

केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची पणजी येथे काल भेट घेतली.
राज्यातील रस्ते आणि महामार्गांच्या पायाभूत सुविधांशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा केली, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.

केंद्रीय मंत्री गडकरी गोव्याला नेहमीच सकारात्मक आणि आवश्यक असलेली केंद्राची मदत देण्यास उत्सुक आहेत. त्यांनी आम्हाला राज्यात विशेषत: ई-मोबिलिटी आणि हरित ऊर्जा क्षेत्रातील प्रकल्प प्रस्तावित करण्यास सांगितले आहे आणि केंद्र सरकारकडून सर्व आवश्यक साहाय्य करण्याचे आश्वासन दिले आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.