नवी दिल्ली
सिने अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने अभिनेते नाना पाटेकर यांनी आपली लैंगिक छळणुक केल्याच्या आरोपानंतर आता केंद्रीय राज्य मंत्री एम. जे. अकबर यांच्यावरही असाच आरोप झाल्याने खळबळ उडाली आहे.अकबर यांनी आपली अनेक वर्षे लैंगिक छळणूक केली होती असा आरोप आता पत्रकारिता क्षेत्रात त्यांच्या सहकारी म्हणून काम केलेल्या महिला पत्रकारांनी केला आहे. या अनुषंगाने काल दिल्लीत महिला माध्यम प्रतिनिधींनी सुषमा स्वराज यांना विचारणयाचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. ‘तुम्ही एक महिला केंद्रीय मंत्री आहात. अकबर यांच्यावर होणार्या आरोपांची चौकशी केली जाईल काय असा सवाल महिला पत्रकारांनी स्वराज यांना केला होता.
हॉलीवूडमधील एक महिला पत्रकार प्रिया रामाणी यांनी अलीकडेच अकबर यांच्यावर ट्विटरवरून लैंगिक छळणुकीचा आरोप केला आहे. त्याआधी त्यांनी ‘व्होग इंडिया’ मासिकात लेख लिहून अकबर यांनी नोकरीनिमित्त आपली मुलाखत घेतली त्यावेळी त्यांनी दिलेल्या अशिष्ट वागणुकीवर त्यांचे (अकबर यांचे) नाव न घेता भाष्य केले होते.
त्यानंतर अलीकडेच रामाणी यांनी ट्विटरवरून त्या लेखात आपण भाष्य केलेले पत्रकार अकबर असल्याचे स्पष्टीकरण केले होते. शुमा राहा या महिला पत्रकारानेही अकबर यांच्यासंदर्भत स्वतःला असाच अनुभव आल्याचे म्हटले आहे.