‘कॅसिनो स्थलांतर प्रक्रिया मी मंत्री असताना झालेली नाही’

0
148

 

वेरेत कॅसिनो स्थलांतराच्या
विरोधकांना पाठिंबा ः कॉंग्रेस
मांडवी नदीतील तीन तरंगते कॅसिनो वेरेच्या बाजूने स्थलांतरित करण्यासाठी विरोध करणार्‍या नागरिकांना कॉंग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे, अशी माहिती गोवा प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते तुलियो डिसोझा यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.
मांडवी नदीतील कॅसिनो जहाजे खोल समुद्रात स्थलांतरित करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. तथापि, तीन कॅसिनो जहाजे वेरेच्या दिशेने स्थलांतरित करण्याचा निर्णय घाईघाईत घेण्यात आला आहे. कॅसिनो जहाजे वेरेच्या बाजूने स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करण्यात आलेला नाही. स्थानिक मच्छीमार आणि नागरिकांना कॅसिनो जहाजांच्या स्थलांतरामुळे त्रास सहन करावा लागणार आहे. कॅसिनोच्या स्थलांतराच्या विषयावरून स्थानिकांना विश्वासात घेण्यात न आल्याने त्यांच्याकडून विरोध केला जात आहे.

आपल्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत मांडवी नदीतील कॅसिनोंचे वेरेच्या बाजूने स्थलांतराची प्रक्रिया सुरू झालेली नाही. बंदर कप्तान मंत्री मायकल लोबो यांच्याकडून चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मायकल लोबो यांच्या कारकिर्दीत कॅसिनोच्या स्थलांतराची प्रक्रिया सुरू झाली आहे, असा दावा माजी बंदर कप्तान मंत्री तथा साळगावचे आमदार जयेश साळगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल केला.

माजी मंत्री साळगावकर यांच्या कारकिर्दीत कॅसिनोच्या स्थलांतराची प्रक्रिया सुरू झाली होती. आता विरोधी पक्षात असल्याने साळगावकर यांच्याकडून कॅसिनोच्या स्थलांतराला विरोध केला जात आहे, असा आरोप बंदर कप्तान मंत्री लोबो यांनी केला आहे.

लोबो यांनी केलेल्या आरोपाला उत्तर देताना साळगावकर यांनी सांगितले की, मांडवी नदीतील कॅसिनो स्थलांतरासाठी बंदर कप्तान खात्याकडे ४ ऑक्टोबर २०१९ रोजी अर्ज सादर करण्यात आला होता. त्यानंतर बंदर कप्तान खात्याने घाईघाईत पर्यायी जागेची पाहणी केली. तर, १८ नोव्हेंबर २०१९ रोजी कॅसिनोच्या स्थलांतराचा आदेश जारी करण्यात आला आहे. ही सर्व प्रक्रिया बंदर कप्तान मंत्री लोबो यांच्या कारकिर्दीत झालेली आहे, असेही साळगावकर यांनी सांगितले.

मांडवी नदीच्या आराखडा एनआयओकडून तयार करण्यात आलेला आहे. त्यात वेरेच्या बाजूने नदीचा भाग साळगाव मतदारसंघात समाविष्ट होत असल्याचे दाखविण्यात आले आहे. लोबो यांनी कॅसिनोच्या स्थलांतराचा आदेश जारी करण्यापूर्वी मांडवितील वेरेच्या बाजूच्या परिस्थितीचा अभ्यास केलेला नाही, असे