सरकारने कॅसिनोसाठी धोरण तयार करण्याची गरज आहे. कॅसिनोचा गोमंतकीयांना लाभ होत नसल्यास कॅसिनो बंद करावेत, अशी मागणी गोवा फॉरवर्डने पत्रकार परिषदेत काल केली. पणजी पोट निवडणुकीसाठी कॅसिनो हा एक मुद्दा बनलेला आहे. गोवा फॉरवर्डच्या कॅसिनोबाबत भूमिका जाहीर करताना पक्षाचे सरचिटणीस मोहनदास लोलयेकर यांनी वरील माहिती दिली. अचानकपणे कॅसिनो बंद केल्यास गोमंतकीय युवकांचा रोजगार बुडू शकतो. परंतु, कॅसिनोवर जास्त गोमंतकीय काम करीत नसल्याने बंद करणे योग्य ठरेल, असेही लोलयेकर यांनी सांगितले.