कॅसिनो कंपनीची वार्षिक शुल्कप्रकरणी याचिका दाखल

0
10

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने एका कॅसिनो कंपनीने कोरोना महामारीच्या काळातील वार्षिक शुल्क प्रकरणी दाखल केलेली याचिका दाखल करून घेतली आहे. तथापि, याचिकादार कंपनीला अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिला आहे. येथील एका कॅसिनो कंपनीने कोरोना महामारीच्या काळातील वार्षिक शुल्क सवलत मिळविण्यासाठी गोवा खंडपीठात याचिका दाखल केली आहे. राज्य सरकारने सदर कॅसिनो कंपनीला कोरोना महामारीच्या काळातील शुल्क भरण्याची सूचना केली आहे.