कॉंग्रेस पक्षाचा आग्वाद नजीक कॅसिनोंचे स्थलांतर करण्यास सक्त विरोध आहे. सरकारने कॅसिनो स्थलांतर करण्यासाठी सुरू केलेल्या हालचालींचा कॉंग्रेस निषेध करीत आहे, असे कॉंग्रेस पक्षाचे सरचिटणीस तथा कळंगुटचे माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांनी पत्रकार परिषदेत काल सांगितले.
बंदर कप्तान मंत्री मायकल लोबो यांनी कॅसिनो आग्वाद नजीक स्थलांतर करण्यासाठी प्रयत्न चालविला आहे. कॅसिनोमुळे कळंगुट मतदारसंघात वेश्या व्यवसाय आणि अंमली पदार्थांच्या व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे, असा दावा फर्नांडिस यांनी केला.
तसेच, कॅसिनोमुळे समुद्रात बोटीतून जलसफरी करणार्या लोकांना अडथळा निर्माण होणार आहे. कळंगुट मतदारसंघात कॅसिनो येऊ नये म्हणून आम्ही कोणत्याही थराला जाऊ शकतो, असा इशारा फर्नांडिस यांनी दिला.