कॅरम स्पर्धेत घनश्याम केरकर विजेता

0
155

एफसी गोवा पेडणे यांनी धारगळ येथे आयोजित केलेल्या अखिल गोवा राज्य पातळीवरील कॅरम स्पर्धेचे विजतेपद घनश्याम केरकर (साळगाव) यांनी पटकाविले तर स्पर्धेतील उपविजेते दिनेश शिरोडकर (पेडणे) यांना प्राप्त झाले.
विजेत्या खेळाडूने दहा हजार रुपये व चषकाची कमाई केली तर उपविजेत्याला ५ हजार रुपये व चषकावर समाधान मानावे लागले. सामाजिक कार्यकर्ते तुळशीदास गावस यांनी प्रथम बक्षीस तर चषक समीर मांद्रेकर यांनी पुरस्कृत केला होता.

या स्पर्धेत एकूण ८४ खेळाडू सहभागी झाले होते. उपांत्य फेरीत पराभूत जान्टी अक्तर व गणपत गोसावी यांना चषक देण्यात आले. उपांत्यपूर्व फेरीत पराभूत खेळाडू विजय केरकर, फ्रान्सिस लोबो, अभय करंडे व दिगंबर खांडेपारकर यांनादेखील चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन तुळशीदास गावस यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी माजी सरपंच भूषण नाईक, माजी उपनगराध्यक्ष सिध्देश पेडणेकर, आयोजन समितीचे प्रमुख दत्ताराम कशालकर, सुशांत म्हामल, नारायण सावळ देसाई, सुनील मालपेकर, दिनेश शिरोडकर, प्रशांत आरोसकर आदी उपस्थित होते.