‘कॅब’ विधेयक आज राज्यसभेत

0
137

लोकसभेत सोमवारी उशिरा रात्री संमत झालेले नागरिकत्व दुरुस्ती विधेयक (सिटिझन्स अमेंडमेंट बिल तथा कॅब) आज बुधवारी राज्यसभेत मांडले जाणार आहे. पाकिस्तान, अफगाणिसातन व बांगला देशातून निर्वासित म्हणून भारतात आलेल्या हिंदू, ख्रिश्‍चन, शीख, बौद्ध व झोराष्ट्रीय धर्मियांना कायदेशीर भारतीय नागरिकत्व बहाल करण्याची तरतूद असलेले हे विधेयक लोकसभेत सोमवारी ३११ विरुद्ध ८० अशा मताधिक्क्याने संमत झाले आहे.
हे विधेयक राज्यसभेत संमत होण्यासाठी मोदी सरकारला १२३ सदस्यांची आवश्यकता आहे.